सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड पंचायत समितीची आमसभा आ. अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या प्रांगणात पार पडली. या आमसभेत विविध गावाच्या महिला पुरुषांनी आपल्या समस्या मांडल्या यावर आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करून अनेकांच्या समस्यांचे जागेवर निराकरण केले.
आमसभेत विहीर व घरकुलाचे रखडलेले अनुदान, वीज समस्या, सिंचन व व्ययक्तिक विहीर, गायगोठा, पाणंद रस्ते, पाणीटंचाई, रस्ते दुरुस्ती, फेरफार नोंदी, रेशनकार्ड, वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तलाठी , ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांचे फोन न उचलणे, शासन स्तरावरील कामे वेळेत न करणे, कार्यालयात उशिरा येणे आदर्दी तक्रारींवरून आ. अब्दुल सत्तार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सिल्लोड तालुक्यातील विहीर व घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. रोजगार हमीचे कामे सुरू करा, सातबारा वर विहिरींची नोंद घेणे, गायरान वरील घरकुल ची जागा नावावर करणेची कारवाई कामी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा अशा सूचना आ. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गावकऱ्यांच्या शासन स्तरावरील विविध अडचणी गावागावात आलेल्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामसभा घ्या ग्रामसभेत नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा असे निर्देश देत ग्रामसभेला संसदेप्रमाणे महत्व असून गावकऱ्यांनी ग्रामसभेत सहभागी होवून आपल्या अडीअडचणी मांडाव्यात असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले. प्रशासकीय स्तरावरील येणाऱ्या अडचणी गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या सभेत आ. अब्दुल सत्तार यांनी जनतेचे प्रश्न एकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवा असे निर्देश दिले.
प्रशासकीय कामात नागरिकांची कोणी अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक अडवणूक पिळवणूक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आ. अब्दुल सत्तार यांनी दिला.
या आमसभेत जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास पा.
दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, देविदास पालोदकर, दुर्गाबाई पवार, देविदास लोखंडे, सुखदेव जाधव, दामूअण्णा गव्हाणे, नगरसेविका राजश्री निकम, मनोज झंवर, राजेंद्र ठोंबरे, संजय डमाळे, भावराव लोखंडे, सतीश ताठे, नरेंद्र पाटील, राजाराम पाडळे, डॉ. संजय जामकर, नायब तहसीलदार शेख हरून गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय वींद्र राजपूत आदिंसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, सोसोयटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसा सदस्य, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.














